विवाहितेचा कार घेण्यासाठी छळ; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विवाहितेचा कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह चार जणांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात राहणाऱ्या भावना रवि चौधरी (वय २९) यांचा विवाह पंजाब राज्यातील खमाने येथील रवि प्रमोद चौधरी यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या काही महिन्यानंतर पती रवि चौधरी याने लग्नात काहीह दिलेले नाही असे टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर लग्नात तुझ्या वडीलांना कार घेण्यासाठी पाच लाख रूपये दिले नाही, तसेच लग्नाच्या वेळी घरगुती वापराचे सामान दिले नाही या कारणावरून शिवीगाळ करणे सुरू केले.

त्यानंतर सासू, नणंद आणि नांदोई यांनी पैशांचा तगादा लावला होता. वडीलांची परिस्थिती हालाखीची असल्याने आपण पैशांची पुर्तता करू शकत नाही असे सांगितल्यावर पती रवि चौधरी याने विवाहितेला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार विवाहितेला सहन न झाल्याने माहेरी निघून आल्या.

दरम्यान विवाहितेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार १६ डिसेंबर रोजी तालुका पोलीस ठाण्यात पती रवि प्रमोद चौधरी, सासू अंजली प्रमोद चौधरी, नणंद प्रिती प्रकाश चौधरी, नंदोई प्रकाश रामकिशन चौधरी दोन्ही रा. नवागाम दिंडोली जि. सुरत गुजराथ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.