विलिनीकरण का होणार नाही?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

अजित पवार यांचा परखडपणा सगळीकडे चालणार नाही, एसटीचे विलिनीकरण का होणार नाही ते त्यांनी सांगावं अस वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

एसटीचं विलिनीकरण होईल असं डोक्यातून काढून टाका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितलं होतं. कोणत्याही सरकारच्या काळात एसटीचं विलिनीकरण शक्य नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

 काय म्हणाले होते अजित पवार

एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. एसटीच्या विलिनीकरणाची मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक सूचक वक्तव्य केले होते. एसटी कामगाराचं शासनात विलिनीकरण शक्य नाही अशी स्पष्ट ग्वाही अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना दिली होती. एसटी कामगारांच्या संपाबद्धल शासनाची भूमिका मांडली.

त्यात ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीचा चेंडू हायकोर्टात आहे, हायकोर्टाच्या निर्देशावरुन विलिनीकरणाची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन झालेली आहे. त्या समितीने आपला अभ्यास सुरु केलेला आहे, त्या समितीने अभ्यासासाठी मुदत वाढ मागितल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. समितीचा अहवाल येईल तेव्हा येईल पण एसटी कामगार-कर्मचाऱ्याचं शासनात विलिनीकरण शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. एसटीचं विलिनीकरण होईल असं डोक्यातून काढून टाका असे अजित पवार म्हणाले होते.

एसटी कामगार शासनात विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यासाठी ते गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन करत आहेत. सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य करुनही ते संपावर कायम आहेत. मागील आठवड्यात कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटनेच्या नेत्यांनी संप माघारी घेत असल्याची घोषणाही केली होती, त्यानंतरही संपावरील एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.