विधिमंडळाच्या फोटोसेशनला देवेंद्र फडणवीसांची दांडी

0

नागपूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीर सावरकर यांच्यासह अनेक मुद्यांमुळे  यंदाचे हिवाळी अधिवेशन सुरुवातीपासूनच वादळी ठरले आहे. दरम्यान आज सर्वपक्षीय आमदारांचं एकत्र फोटोसेशन झालं. विधानभवनाच्या बाहेर पहिल्यांदाच सर्व आमदार मतभेद विसरून फोटोसेशनसाठी एकत्र जमले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरला. सर्वपक्षाचे सर्व आमदार उपस्थित असताना, देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थित राहणं अपेक्षित होतं, मात्र ते फोटोसेशनला आलेच नाहीत.  यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विरोधीपक्ष नेते आणि सर्वपक्षीय सदस्यांचे एकत्रित फोटोसेशन करण्याची विधीमंडळाची परंपरा आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा देत आंदोलन करतात, त्याच विधानभवनाच्या आवारात सर्वपक्षीय आमदार फोटोसेशनसाठी एकत्र येतात. यानुसार आजही सर्वांनी फोटोसेशन केले.

दरम्यान, विरोधी पक्षनेत्याला आज बोलवले होते. मात्र वैयक्तिक कारणामुळे आज ते हजर राहू शकले नसल्याचे वीरधनसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.