विद्यार्थी केंद्रित शिक्षण हि काळाची गरज- संजय मालपाणी

0
        मुलांमधील सुप्त गुणांचे आकलनावरून त्यांची आवड लक्षात येते
जळगांव.दि,12- पुर्वी शिक्षण हे सेवा कार्य म्हणून समजले जात होते. परंतु मध्यंतरीच्या काळात शासनाने शाळांचे अनुदानच बंद करून सेवा कार्या ऐवजी उत्पनाचे साधन म्हणून बघण्याचा दृष्टीकोन बळावल्याने या क्षेत्रात मुल्य शिक्षणाचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आजच्या काळात मुलांना मुल्य शिक्षणासोबतच जिवन शिक्षण त्यांच्या आवडीनुसार देणे हे अपेक्षित आहे. गीता अध्ययन हे धार्मिक ग्रंथ नसून जिवनमुल्याचाच नव्हे तर व्यवस्थापन, कामाची आखणी त्यातुन प्रेरणा देणारे शास्त्र आहे असे धृव अकॅडमीचे संचालक संजय मालपाणी यांनी लोकलाईव्हच्या दिलखुलास मुलाखतीत बोलतांना सांगीतले.
      स्वामी गोविंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनातुन गिता अध्ययनातुन शिकवण, जिवनमुल्ये आत्मसात केली. महाविद्यालयीन जिवनापासूनच गिता अध्ययनाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या जिवनात रूजविण्याचे कार्य धृव अकॅडमीव्दारे विद्यार्थ्यांचे शालेय जिवन, शिक्षण आणि मानसिक आरोग्य तणाव मुक्त असावे असा प्रयत्न केला. पालकांनी विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे न लादता त्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास ते नक्कीच गीता अध्ययनानुसार मन आणि बुद्धीच्या माध्यमातुन काम करणे सोपे होईल. पालक आपल्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी मोठमोठया शहरात विविध ठिकाणी शिक्षणासाठी पाठवले जाते.
 गुणवत्ता ओळखून  प्रशिक्षण दिले जावे.
मन , बुद्धी आणि कर्म यातील भेद समजावून सांगणे म्हणजेच मुलांना समजेल त्यांच्या बुद्धीला पेलवेल असे कार्य विद्याथ्यार्ंना दिले गेले पाहिजे. आणि मुलांना समजेल असे, त्यांचा कल समजून त्यांना शिक्षण दिले गेले पाहिजे. धृव अकॅडमीतर्फे मुलांच्या कला, संगीत, नृत्य, विज्ञान अशा सुप्त गुणाना वाव देवून त्यांच्यात 99.40 उच्चांक प्राप्त करणार्‍या विदयार्थ्यांना गोवा आयआयटीत प्रवेश मिळाला असे सांगीतले. मुलांची शारीरीक बुंद्धीमत्ता यात खेळाडू, नैसर्गीक आवड,गुणवत्ता,विज्ञान विषयी, निसर्ग पर्यावरण, गीरीभ्रमण, भौमितीक बुद्धीमत्ता, आकारमान,रंगसंगती यांची विविध गुणवत्तांच्या सिद्धांतानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता ओळखून त्यांना प्रशिक्षण दिले जाते.
दप्तरांचे वाढते ओझे कमी करण्याचा प्रयत्न होणार
विद्यार्थ्यांमधे वाढते नैराश्याचे प्रमाण यावर शाळा व्यवस्था व पालक हे घटक कारणीभुत आहेत. मुलांच्या अपेक्षा जतन हनन करण्याचे कार्य पालंकानी करू नये,  सर्वच मुले डॉक्टर, इंजिनिअर, होतील असे नाही, मुलांच्या सवयी, वागणे कल यावरून त्याची आवड पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे राज्य शिक्षण मंडळाचे पाठ्यपुस्तके सर्वच अभ्यासक्रमासाठी उपयुक्त आहेत. खाजगी शाळांमधे मोठया प्रमाणावर प्रायव्हेट पब्लिकेशनची पुस्तके ,त्या प्रमाणात वहया मोठ्या प्रमाणावर यामुळे दप्तराचे ओझे वाढले आहे. ना. प्रकाश जावडेकर यांनी आगामी काळात 50 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे.
 न्यायाधिशांनी उभे राहिले पाहिजे असा दर्जा
शिक्षण हक्क कायद्यातर्गत विद्यार्थी केंद्रीत शिक्षण योजनेव्दारे प्रवेश देण्यासह विद्यार्थ्यांना समोर ठेवून अभ्यासक्रम असावा, पालकांपेक्षा मुले शिक्षकाजवळच अधिक वेळ रहात असतात. त्यामुळे मुले पालकांपेक्षा शिक्षकांचेच जास्त ऐकतात. बोटावर मोजण्या इतपत कामचुकार शिक्षकांमुळे जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळांचे चित्र मध्यंतरी काळात काहीसे खालावले होते. परंतु त्यांच्या मुळे सर्वांनाच दोष देणे चुकीचे आहे. मुलांना मुल्य शिक्षणासोबतच जिवनशिक्षण देणे हि काळाची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमात बदल घडविणे हि शालेय शिक्षणाची जबाबदारी शासनाची आहे. सर्वच शाळां अनुंदानीत असाव्यात, प्राथमिक शिक्षकाचा दर्जा असा असला पाहिजे कि, शिक्षक न्यायाधिशासमोर गेले तर न्यायाधिशांनी उभे राहिले पाहिजे असा दर्जा शिक्षकाचा असला पाहिजे असे मत धृव अकॅडमीचे संचालक संजय मालपाणी यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.