विद्यमान खासदारांपैकी पतंग कोणाची कटणार

0

भाजपामधे जोरदार इनकमिंगः

जळगांव.दि.20-
जिल्हयात सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगातर्फे आचारसंहिता लागण्यापूर्वीच काँग्रेस, राष्ट्रवादीनं लोकसभा निवडणुकासाठी उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र सत्ताधारी भाजपानं अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. विविध ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून जोरदार इनकमिंग सुरू आहे.
तरीही त्यांच्याकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नसल्याने कोणाची पतंग कटणार कोणाच्या मांजाला ढिल दिली जाणार यासह सध्या होलाष्टक सुरू असल्यानं भाजपाकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जात नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राज्यात 22 तर जिल्हयात दोन विद्यमान खासदार कोणाचा पत्ता कट होणार याची पदाधिकार्‍यांसह अनेकांना उत्कंठा
होळीच्या आधीचे आठ दिवस होलाष्टक असतं. या काळात शुभ कार्य वर्ज्य मानलं जातं. त्यामुळेच भाजपाकडून उमेदवार यादी जाहीर केली जात नसल्याचे बोलले जात आहे. होलाष्टक संपल्यावर भाजपाकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. भाजपाच्या विद्यमान खासदारांचा पत्ता बहुतेक ठिकाणी कापणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपाचे सध्या 22 खासदार आहेत. यावर्षी भाजपा राज्यात 25 जागा लढवणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपामध्ये जोरदार इनकमिंग झाल्यानं कोणकोणत्या विद्यमान खासदारांचा पत्ता कापला जाणार आणि त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.