विकास कामांच्या प्रामाणिक प्रयत्नाला भक्कम साथ द्या !

0

ना.गुलाबराव पाटलांचे आसोदा वासीयांना आवाहन

जळगाव :- जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात नागरिकांच्या मागणीनुसार विकास कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. असोदा येथे मागील काळात मला कमी मते मिळाली मात्र 3 वर्षाच्या काळात कोट्यावधीचा निधी देऊन मी विकास कामांचा अनुशेष भरून काढला. तुम्ही सुध्दा मतदानाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विकास कामांच्या माझ्या प्रामाणिक प्रयत्नाला तुमचे भक्कम पाठबळ राहू द्या असे आवाहन शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी असोदा येथे माळी समाज सामाजिक सभागृहाच्या शुभारंभ प्रसंगी केले.

शासनाच्या मूलभूत सुविधे अंतर्गत राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून माळी समाजा करिता सामाजिक सभागृह बांधकामासाठी 10 लक्ष निधी मंजूर आहे. त्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले. यावेळी रोजगार हमी योजनेचे तालुक्याचे सभापती तुषार महाजन यांनी असोदा व परिसरात गुलाबराव पाटील यांनी केलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. तर नगरसेविका सविता नेतकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संत सावता माळी यांच्या समाधीला, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

वयाची 105 वर्षे पूर्ण केलेल्या विठ्ठल सोमा माळी यांचा शाल श्रीफळ ड्रेस व धोतर जोडा देऊन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संत सावता माळी मित्र मंडळा तर्फे व आसोदा ग्रामस्थांनी शिवसेनेचे उपनेते तथा राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल श्रीफळ व गुलाबाचा हार घालून सत्कार केला.

भाऊ, मी तुमचाच ! – रा.कॉ.चे विकास पाटील

नशिराबादचे सरपंच यांनी जाहीर सभेत नम्रपणे सांगितले की, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी असोदाच नाहीतर नशिराबादला सुद्धा भरीव निधी देऊन विकास केला आहे. मी मूळचा शिवसैनिक असून भाऊंना विश्वासात घेऊन मी राष्ट्रवादीत गेलो. परंतु भाऊ मी कुठेही असलो तरी मी तुमचाच आहे. तुमच्यासाठी मी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही राष्ट्रवादी चे सरपंच विकास पाटील यांनी दिली.

यावेळी व्यासपीठावर उपसरपंच .अरुण कोळी, बापू महाजन मनपाच्या नगरसेविका संगीता नेतकर, नशिराबादचे सरपंच विकास पाटील, रो.ह.योजनेचे तालुका सभापती तुषार महाजन, माळी समाज अध्यक्ष अरुण माळी , सुनील माळी , पिक संरक्षक सोसायटीचे चेअरमन धनराज कोल्हे ,दूध उत्पादक सोसायटी चेअरमन राजू.महाजन सर , भूषण दुसाने, डॉ रमाकांत कदम, , सचिन चौधरी, ललित बाविस्कर ,चंद्रभान माळी, श्री संत सावता माळी मित्र मंडळ यांच्यासह माळी समाज बांधव भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन किशोर चौधरी यांनी केले तर आभार माळी समाज अध्यक्ष अरुण माळी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.