लोकशाहीचा ‘लोकारोग्य’ दिवाळी अंक म्हणजे सर्वांसाठी आरोग्यदायी मेजवानी !

0

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे गौरवोद्गार ; कोरोनासाठी प्रशासन सज्ज 

जळगाव – दैनिक लोकशाहीतर्फे प्रकाशित करण्यात आलेला ‘लोकारोग्य’ दिवाळी २०२० हा सर्वांसाठी आरोग्यदायी मेजवानी देणारा असून या दिवाळी अंकातून नागरिकांना आरोग्याविषयी काय काळजी घ्यावी यासह इतर महत्वाचे लेख आल्याने हा दिवाळी अंक वाचक आणि नागरिकांसाठी वाचनीय असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी  ‘लोकारोग्य” दिवाळी २०२०च्या विमोचनप्रसंगी काढले .यावेळी त्यांनी   जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी दुसर्‍या लाटेची शक्यता असून यासाठी प्रशासन संपूर्ण सुविधांनी सज्ज असून नागरिकांच्या सहकार्याने कोरोनावर मात करता येईल असा  विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यांनी यावेळी व्यक्त केला .  ‘लोकारोग्य’  दिवाळी अंकाच्या विमोचनप्रसंगी कोविड -१९ टास्क फोर्स मेंबर डॉ. लिना पाटील, लोकशाही समूहाचे संचालक राजेश यावलकर , संपादक सल्लागार धों .ज. गुरव , सौ. शुभांगी यावलकर , व्यवस्थापक सुभाष गोळेसर ,जाहिरात वितरणाचे विवेक कुलकर्णी ,  किशोर कोळी , अनिकेत पाटील आदी उपस्थित होते .

पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले कि ,  लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांच्यासह नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या लाटेचा आपण बर्‍यापैकी प्रतिकार करण्यात यश संपादन केले आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता दुसरी लाट आली तरी तिला थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली .

प्रत्येकाने काळजी घ्यावी -डॉ. लीना पाटील 

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येकाने काळजी घेतल्यास कोरोनाला आपण थोपवू शकतो . तसेच कोणतीही लक्षणे जाणवल्यास टेस्ट करून घ्यावी जेणे करून आजार बळावणार नाही असा सल्ला कोविड -१९ टास्क फोर्स मेंबर डॉ. लिना पाटील यांनी बोलताना व्यक्त केला . शाळांमधील मुलांचीही कोरोना चाचणी आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.