लॉकडाऊनमध्ये तरुणांना शेतीची ओढ….

0

प्रतिक जोशी, जळगाव
कोरोना महामाहरीच्या संकटामुळे बाहेर गावी शिक्षणासाठी गेलेली तरुण मंडळी शहरातून पुन्हा गावी आली आहे. गावी येऊन दिनचर्या बदलल्यामुळे शेती कडे तरुणाईचं आकर्षण वाढल आहे.
पुणे येथे एम एस्सी च्या शिक्षणासाठी गेलेला विद्यार्थी वरून पाटील हा लॉकडावूनच्या काळात गावी आपल्या घरी परतला . शहराकडील असलेलं व्यस्त दिनक्रम त्यामुळे आणि आता गावी आलेली शांतता यामुळे दिवस कंटाळवाणा जाऊ लागला . त्यामुळे त्याने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या शेतकरी मामाच्या मदतीने घराला लागून असलेल्या मोकळ्या जागेत शेतीचे पाठ शिकून घेतले. आणि प्राथमिक स्तरापासून त्याने १ गुंठा जागेत शेतीची लागवड अगदी नांगरणीपासून स्वःता बैलगाडी हाकत केली आहे . तुरीच्या शेतीची तसेच विविध भाजीपाला लागवड केली आहे . आणि या केलेल्या शेतीची मशागत करताना एक वेगळाच आनंद मिळतो त्याच बरोबर लॉकडाऊन असूनही दिवस रमत गमत अगदी सहज निघून जातो असे वरूनचे म्हणणे आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.