लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाचा मृत्यू

0

– कुरंगी गावावर शोककळा

पाचोरा (प्रतिनिधी) : लग्नाची तारीख जवळ येते आहे म्हणून घरात लग्नाची एकीकडे लगभग सुरु असतांना दुसरीकडे गिरणा नदीच्या वाहत्या पाण्यात पडुन नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुरंगी गावात घडली.

तालुक्यातील कुरंगी गावातील शेतमजुरी करणारा रमेश झगा पाटील (वय – २७) हा दि.११ फेब्रुवारी रोजी ४. ४५ वाजेच्या सुमारास गिरणा नदीवर दोघ बहीणीं घरातील कपडे धुण्यासाठी आल्या असता त्यांच्या बरोबर आला होता. अचानक पाय घसरल्याने तो नदीच्या वाहत्या पाण्यात गेल्याने मृत्यू झाला.

मयत रमेश याचा दि. १८ फेब्रुवारी रोजी विवाह पद्मालय देवस्थान येथे नियोजित होता. त्याची नववधु पुणे येथील होती अचानक रमेशच्या मृत्यूची बातमी घरच्यांना आणि परीसरात मिळताच एकच शोककळा पसरली. त्याचा मृतदेह पाचोरा येथे ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला. शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. मयतास आई, दोन बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे. अंत्यत प्रतिकुल परीस्थितीत त्यांचे कुटुंब उदरनिर्वाह करीत आहे. त्यामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे शासनाने त्वरित नैसर्गिक आपत्तीतुन मदत करावी अशी मागणी कॉग्रेसचे सचिन सोमवंशी यांनी तहसीलदार यांच्या कडे केली आहे. मयत रमेश पाटील यांचेवर शोकाकुल वातावरणात  दि. १२ रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.