रेल्वेची पहिल्याच दिवशी साईट क्रॅश; ऑनलाईन तिकीट बुकिंगचा उडाला बोजवारा

0

नवी दिल्ली । लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांव्यतिरिक्त इतर प्रवाशांना घरी पोहचवण्यासाठी १२ मेपासून रेल्वे १५ पॅसेंजर ट्रेन चालवणार आहे. या पॅसेंजर ट्रेन जोडीने चालवण्यात येतील. (return journeys) यानुसार या ट्रेनच्या एकूण ३० फेऱ्या होतील. यासाठी आज (सोमवारी) दुपारी ४ वाजल्यापासून IRCTC या रेल्वेच्या संकेतस्थळावर तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग सुरु होणार होते. मात्र, रेल्वेचे हे संकेतस्थळ उघडत नसल्याच्या तक्रारी आता समोर येत आहेत.

दुपारी ४ वाजल्यापासून बुकिंगला सुरुवात होणार होती. मात्र, रेल्वेचे संकेतस्थळ उघडायला गेल्यास This page not working असा संदेश झळकत आहे. त्यामुळे रेल्वेने आपल्या गावी जाण्याची आस लावून बसलेल्या लोकांचा हिरमोड झाला आहे.

दरम्यान, रेल्वेकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एकाचवेळी अनेक लोक संकेतस्थळावर आल्यामुळे रेल्वेची साईट क्रॅश झाल्याची शक्यता आहे. मात्र, थोड्याचवेळात म्हणजे ६ वाजता संकेतस्थळ पुन्हा सुरु होईल, असे IRCTCने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.