रेल्वेचा धक्का लागून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धावत्या रेल्वेचा धक्का लागल्यामुळे ३२ वर्षीय महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ११ वाजता ही घटना उघडकीस आली आहे . योगेश गुलाब गायकवाड ( वय ३२, रा. खंडेरावनगर ) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

गायकवाड हे महापालिकेत मलेरीया विभागात विभागात कामाला होते. मंगळवारी सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर ते घरी गेले. त्यांच्या पत्नी व मुले दोन दिवसांपूर्वीच माहेरी गेलेल्या आहेत. दरम्यान , आई व लहान भाऊ अनिल गायकवाड यांच्याशी बोलल्यानंतर रात्री सात वाजता ते ताक आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नाही.

दरम्यान  खंडेरावनगर रेल्वेपुलाजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागुन तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे व रामानंदनगर पोलिसांनी परिसरातील काही तरुणांना दिली. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी गेलेल्या तरुणांनी गायकवाड यांना ओळखले. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सुशील चौधरी, हरीषकुमार डोईफोडे यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला.

बुधवारी दुपारी १२ वाजता शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मृत गायकवाड यांच्या पश्चात आई, लहान भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.