रेपो दर ‘जैसे थे’च; मार्च तिमाहीत जीडीपी सकारात्मक होईल – शक्तिकांत दास

0

नवी दिल्ली – कोविड महासंकटाच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कोणतेही बदल केले नाही. आर्थिक धोरण समितीच्या (MPC) आढावा बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणतेही बदल केले नाही. यामुळे रेपो रेट ४  टक्क्यांवर कायम राहणार आहेत. तर रिव्हर्स रेपो रेट देखील ३.३५ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.शक्तिकांत दास म्हणाले कि, जागतिक अर्थव्यवस्था सुधारत आहे. परंतु ही सुधारणा एकसारखीच नाही. भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक चिन्हे दिसत आहेत. चौथ्या तिमाहीत जीडीपी दर सकारात्मक होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. २०२०-२१ आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर उणे ९.५ टक्के असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रेपो रेट म्हणजे काय ?  

सार्वजनिक बँका आपल्या कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी रिजर्व्ह बँकेकडून पैसे घेते, त्या पैशांवर रिजर्व्ह बँकेकडून जो दर आकारला जातो त्यास रेपो रेट असे म्हणतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.