‘रेकॉर्डब्रेक’निर्णयांचे शिवसेनेकडून भाजपचे कौतुक

0

मुंबई :- सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या धोरणांचे वाभाडे काढणाऱ्या शिवसेनेच्या भाषेत भाजपशी युती झाल्यानंतर कमालीचा बदल झाला आहे. शिवसेनेकडून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या २२ निर्णयांचे कौतुक आजच्या शिवसेनेच्या मुखपत्रामधील ‘सामना’तील अग्रलेखातून पुन्हा एकदा प्रत्यय आला.

यापूर्वी सत्तेत असतानाही साडेचार वर्षे राज्य शासनावर कायमच बाण उडवणाऱ्या शिवसेनेला खुश करणारे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता सरकारचे तोंडभरुन कौतुक केले जात आहे. सत्तेत कुणीही असले तरी आपापल्या परीने ते राज्य चालवण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, विरोधात हे कसे फसवे आहे किंवा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खूश वगैरे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे हे नेहमीचेच तुणतुणे वाजवीत असतात, असे शिवसेनेने म्हटले आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर सरकारने नुकतेच नवे उद्योग धोरण जाहीर केले होते. या धोरणाची अग्रलेखातून कौतुक केले जात आहे.

यामध्ये म्हटले आहे की, राज्य मंत्रिमंडळाचे ‘रेकॉर्डब्रेक’ निर्णय आणि आणि महाराष्ट्राला पुन्हा ‘नंबर वन’ बनविणारे नवीन उद्योग धोरण याचा फायदा राज्याला आणि जनतेलाच होणार आहे. विरोधकांना मात्र यामुळे ‘ब्रेक’ लागणार आहे. कदाचित म्हणूनच यातही त्यांना राजकीय ‘कुसळ’ दिसू शकते. खरे म्हणजे त्यांच्या राजवटीतील खड्डा भरून काढत महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त करायला हवा. सरकारचे ‘ब्रेकिंग’ निर्णय आणि उद्योगाचे ‘अव्वल’ धोरण यामुळे यापुढेही महाराष्ट्र नंबर वनच राहील याविषयी आमच्या मनात शंका नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.