रिझर्व्ह बॅंकेचेही “वर्क फ्रॉम होम’

0

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीच्या भयामुळे रिझर्व्ह बॅंकेने आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

देशातील बाधितांची संख्या 172 वर पोहोचली आहे. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यात मुंबईतील एका रहिवाशाचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारने केलेल्या सुचनेनुसार रिझर्व्ह बॅंकेने ही उपाय योजना केली आहे. आर्थिक स्थैर्यासंदर्भातील बैठक नेहमीप्रमाणे होतील. मात्र त्या व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारने लोकांनी कामामशिवाय घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. दरम्यान गर्दी होणारी सर्व ठिकाणे महाराष्ट्र सरकारने बंद केली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.