राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पाचोरा शहरातुन रॅली

0

पाचोरा –  पाचोरा – भडगाव ग्राहक सेवा संघातर्फे दि. २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांचे प्रबोधन व्हावे, ग्राहक जागृती व ग्राहक शिक्षणासाठी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शहरातील श्री. गो. से. हायस्कूल, कै. पी. के. शिंदे विद्यालय, न्यु उर्दु हायस्कूल ज्यनियर काॅलेज, जागृती विद्यालय यातील विद्यार्थी – विद्यार्थींनींनी “जागो ग्राहक जागो”, “राष्ट्रीय ग्राहक दिनाचा विजय असो”, “ग्राहक संरक्षण कायदा – २०१९ ग्राहक हिताचा कायदा”, “नहीं चलेगी, नहीं चलेगी मिलावट नहीं चलेगी”, “दिशाभुल करणाऱ्या खोट्या, फसव्या, अनुचित जाहिराती बंद करा”, “जागो ग्राहक जागो” अशा आषयाचे बॅनर हातात घेऊन घोषणा दिल्या. यावेळी नागरिक कुतुहलाने रॅली बघतांना रॅलीचे कौतुक करीत होते.

या रॅलीत प्राचार्य डी. एफ. पाटील, शिला पाटील, आनंद नवगिरे, खलील शेख, अशोक महाजन, डी. आर. कोतकर, डी. ए. पाटील, वैशाली भालेराव, रविंद्र जाधव, विजय पाटील, शेख रफीक शेख मुसा, आर. एस. वाणी, व्ही. आर. पवार, एस. आर. बागुल, राजेश धनराळे, राजेंद्र जगताप, राजु साथी, छोटु वाघ हे सामील झाले होते. शहरातुन रॅली फिरुन छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील हुतात्मा स्मारकात आणण्यात आली. याठिकाणी राष्ट्रीय ग्राहक दिनावर व ग्राहक संरक्षण कायदा या विषयावर   प्राचार्य डी.  एफ. पाटील, शिला पाटील, आनंद नवगिरे यांनी मार्गदर्शन केले. रॅलीत उपस्थितांचे आभार अशोक महाजन यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.