राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत रब्बी हंगामासाठी अनुदानावर प्रमाणित बियाणांचे वितरण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रब्बी हंगामात हरभरा पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामामध्ये हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरणाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा पिकाचे 10 वर्षाआतील पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, आरव्हीजी-202 व बीडीएनजीके-798 या वाणांचे एकूण 6219 प्रमाणित बियाणे रक्कम रुपये 2500 प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच प्रात्यक्षिके अंतर्गत 66 क्विंटल हरभरा बियाणे मोफत वितरीत करण्यात येणार आहे. या अभियानात प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

तसेच सन 2021-22 मध्ये बियाणे व लागवड उप अभियानाअंतर्गत ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत 10 वर्षावरील जाॅकी -9218 या वाणाचे एकूण 5373 क्विंटल प्रमाणित बियाणे रक्कम रुपये 2500 प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेत प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत लाभ देय आहे.

तसेच सन 2021-22 बियाणे व लागवड उप अभियानाअंतर्गत ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत 10 वर्षावरील जॉकी- 9218 या वाणाचे एकूण 5373 क्विंटल प्रमाणित बियाणे रक्कम रुपये 2500 प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेत प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत लाभ देय आहे.

या सप्ताहात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे बियाणे वितरण होणार आहे. तसेच सदर सप्ताहासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. ग्राम कृषी विकास समिती व बियाणे पुरवठादार संस्थांच्या समन्वयाने हरभरा प्रमाणित बियाणे वितरण करण्यात येणार आहे.

तसेच या मोहिमेअंतर्गत हरभरा बियाण्यास बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक आयोजन करुन बीज  प्रक्रियेचे महत्व शेतकऱ्यांना अवगत करण्यात येणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त अर्जदारांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.