राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत प्रमाणित बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

जळगाव :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत सन 2021-22 अंतर्गत परमिट वाटपावर प्रमाणित बियाणे वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुग-बीएम2003-2, उत्कर्षा उपलब्ध असून किंमतीच्या 50 टक्के किंवा उच्चतम रुपये 5 हजार प्रती क्विंटल यापैकी किमानप्रमाणे. उडीद-टीएयु-1, किंमतीच्या 50 टक्के किंवा उच्चतम रुपये 2 हजार 500 प्रती क्विंटल यापैकी किमानप्रमाणे. मका-उदय, किंमतीच्या 50 टक्के किंवा उच्चतम रुपये 10 हजार प्रती क्विंटल यापैकी किमानप्रमाणे. बाजरी-धनशक्ती, किंमतीच्या 50 टक्के किंवा उच्चतम रुपये 3 हजार प्रती क्विंटल यापैकी किमानप्रमाणे अनुदान मिळणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा. एका शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंत लाभ देय असून त्याचप्रमाणात त्याने बियाणे मागणी नोंदवावी. बियाणे महाबीज यांचे जिल्हा व्यवस्थापक, मोबाइल क्रमांक-8669642722, विपणन व्यवस्थापक  श्री. फिरके- 9822327415, पद्मालय शेतकरी उत्पादक कंपनी शिवणी, ता.भडगाव अध्यक्ष राहुल पाटील-9423158786/8806000869 याअधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.

यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, सात बारा उतारा आदि कागदपत्रे सोबत जोडावी. अधीक माहितीसाठी आपल्या तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.