राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त एकता संमेलन

0

मुक्ताईनगर – येथील परिवर्तन चौकात काँग्रेस कमिटी तर्फे महात्मा गांधीजी यांची प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले . त्यांच्या सत्य अहिंसा व सत्याग्रह या विचारसरणी ची आठवण करून देण्यासाठी काँग्रेस कमिटी तर्फे एकता संमेलनाचे आयोजन करण्यात आले  या संमेलनात  विविध पंथांच्या धर्मगुरूंना निमंत्रित करून त्यांनी आपपल्या धर्माविषयी प्रभोधन पर मार्गदर्शन केले . यामध्ये महानुभव पंथाचे ब्रिजलाल महाराज, बौधाचार्य के.वाय सुरवाडे यांनी आधुनिक युगात गांधीजींचे वैचारिक महत्त्व पटवून दिले.. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर काँग्रेस प्रभारी विरेंद्रसिंग पाटील यांनी संघ विचारसरणी वरती कडाडून टिका केली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमास हजेरी लावून अभिवादन केले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील , तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, प्रभाकर पाटील यांनी गांधीजी विषयी आपले विचार मांडुन शहीद दिनाचे महत्त्व पटवून दिले .प्रा.सुभाष पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आसिफ खान यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव असिफ खान इस्माईल खान , संजय पाटील , मागास विभाग जिल्हा उपाध्यक्ष बि.डी गवई ,महिला तालुकाध्यक्ष मनीषा जावरे, मुक्ताईनगर शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे ,सलीमजी मंत्री ,अल्पसंख्याक अध्यक्ष आलम शहा, ता उपाध्यक्ष दिनकर भालेराव, युवक अध्यक्ष निराज बोराखेडे, मीडिया सेल अध्यक्ष सादिक खाटीक ,प्रा.एस डी पाटील रामराव पाटील अमोल पाटील रामू ढगे विजय पारधी पु स धायल, प्रभाकर पाटील ,अनिल सोनवणे, बाबुलाल बोराडे, अरुण कांडेलकर ,प्रवीण झोपे ,सुप राव देशमुख,सुरेश भोलाने, शामराव भोई, अतुल जावरे,अ्ँड कुणाल गवई, सतिश गायकवाड सर,संजय धामोळे, महेंद्र बोरसे,गणेश पाखरे, फिरोज खान ,आरिफ रब्बानी,

आनंदा कोळी, शेख युनूस मण्यार ई पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.