रावेर लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी प्रसिद्धी पत्रकानुसार पदाधीकाऱ्याची मागणी

0

वरणगाव | प्रतिनिधी
अगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकी साठी उमेदवाराची घोषणा होत असल्याने परिसरातील शिवसैनीकानी युती झाल्यान रावेर लोकसभेची उमेदवारी शिवसेनेला मिळवण्यासाठी कार्यकर्ते व पदाधीकाऱ्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राज्यात व केंद्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची पुन्हा युती झाल्यान जागा वाटपा बाबत लवकरच उमेदवाराची घोषणा केली जाणार असल्याने भुसावळ तालुक्यातील शिवसेनेचे पदाधीकारी व कार्यकर्त्याची नुकतीच पार पडलेली बैठक व मुख्यमंत्री यांच्या सभेला प्रतिसाद न मिळाल्याच्या दाव्यानुसार रावेर लोकसभेची उमेदवारी हि शिवसेनेला देण्याची मागणी जोर धरत आहे कारण भुसावळ येथे नुकतीच मुख्यमंत्री देवैद्र फडणविस यांच्या सभेला गर्दी न झाल्यान रावेर लोकसभेची जागा शिवसेने कडे जाते की काय ? असा सभ्रम नागरिका मध्ये निर्माण झाला आहे
परिसरात भाजपाचे दोन लाख सक्रिय सदस्य असल्याचा दावा केला होता तर मुख्यमंत्री यांच्या सभेला कार्यकर्ते का आले नाही असा प्रश्न आहे खडसे परिवारा बदल स्पष्ट नाराजी व्यक्त न करता सदरची जागा शिवसेने कडे देण्याची मुक संमती मुख्यमंत्र्याच्या सभेला दिल्याची हि पावती असल्याचे समल्या जात आहे.
या पुर्वी भाजपाने केलेल्या एका सर्वेमध्ये तेरा अकार्यक्षम खासदारा मध्ये रक्षा खडसे यांचे नाव एका वृतवाहिणीने दाखविले होते तसेच एकनाथराव खडसे यांना मंत्रीमंडळातून काढून दोन ते अडीच वर्ष उलटूनही त्यांचे मंत्री मंडळात पुनरवसन झालेल नाही या वरून भाजपात आता नाथाभाऊ बद्दल काय खलबत्ते शिजत आहे हे सांगण कठीण आहे.
परिसरात शिवसेनेचे वाढते प्राबल्य जिल्हा प्रमूख यांचा वाढता प्रभाव त्याच प्रमाणे भाजपा मधील अर्तगत गटबाजी या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही
शिवसेनेने विविध प्रसिध्दी पत्रकामध्ये खडसे परिवाराला स्पष्ट सेकंत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.