रावेरमध्ये अवैध रॉकेलसह पेट्रोल, डिझेलचा साठा जप्त

0

रावेर : शहरात झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी बुधवारी रात्री राबविलेल्या सर्चिंग ऑपरेशनमध्ये एकूण एक लाख 77 हजार 475 रुपयांचे निळे रॉकेल, पेट्रोल, व डीजेलचा अवैधसाठा मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी शेख शरीफ शेख मुस्लीम (रा.भोईवाडा, रावेर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपींच्या धरपकडमध्ये सापडला साठा

शहरातील शिवाजी चौकाजवळ रविवारी रात्री दोन समाजाच्या गटात झालेल्या दंगलीनंतर गेल्या पाच दिवसापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू असून बुधवारी रात्री राबविलेल्या सर्चिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांना तीन हजार 120 लिटर निळे रॉकेल, 80 लिटर पेट्रोल व 35 लिटर डीजेल असा एकूण तीन हजार 235 लिटरचा अवैध विनापरमीट असलेला साठा रात्री पावणे बाराच्या सुमारास पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपीच्या घरासमोर झाडाच्या आडोशाला असलेल्या पत्री शेडमध्ये एक लाख पाच हजार 350 रुपये किंमतीचे प्रत्येकी 200 लीटरचे एकूण 14 पत्री ड्रम त्यामधे तीन हजार 10 लीटर निळे रंगाचे रॉकेल, तीन हजार 850 रुपये प्लास्टिकचे सहा कॅन व त्यात एकूण 110 लीटर निळे रॉकेल, सहा हजार रुपयांचे दोन मोठे कॅन 60 लिटर मापाचे त्यामधे 75 ते 80 लिटर पेट्रोल, दोन हजार 275 रुपयांचे एक 35 लीटर मापाची कँन त्यामध्ये 35 लिटर डिझेल असा अवैध निळे रॉकेल, पेट्रोल, व डीजेलचा साठा मिळून आला आहे. तसेच 60 हजार रुपये किमतीची एक लाल रंगाची एक अ‍ॅपे मालवाहू रीक्षा (क्र.एम.एच.12 एफ.डी.8194) असा एकूण एक लाख 77 हजार 475 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कॉन्स्टेबल सुरेश आनंदा मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख शरीफ शेख मुस्लीम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.