रायसोनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची स्मोक झोन डिटेक्शन उपकरणाची निर्मिती

0

जळगाव | प्रतिनिधी
  येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील अंतिम वर्षातील अंजली वाणी, गौरी नेवे, रश्मी चौधरी व प्रेरणा खडके या विद्यार्थ्यांनी स्मोक झोन डिटेक्शन सिस्टिम या उपकरणाची निर्मिती केली आहे. या संशोधन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सार्वजनिक ठिकाणी व्यसन करणा-या व्यक्तीला पकडण्यासाठी पूर्णपणे मदत होऊ शकते. शाळा, महाविद्यालय, शासकीय, खाजगी कार्यलय, कंपनी, रेल्वे, बसस्थानक, उद्यान इत्यादी सार्वजनिक ठिकाणी या तंत्रज्ञाचा वापर करता येऊ शकतो आणि धूम्रपान व मद्यपान करण्यास रोख लावू शकतो. स्मोक झोन सिस्टीम तयार करण्यासाठी फक्त १५ हजार इतका खर्च आला आहे. संशोधक विद्यार्थी अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत.
या सिस्टीमची निर्मितीसाठी रास्पबेरी पाय-३, गेस सेन्सर, स्मोक सेन्सर, बजर, एमक्यू-३ सेन्सर, व डेशबोर्ड यांची आवश्यकता राहील. उपकरण हाताळण्यासाठी व्यक्तीची आवश्यता नाही. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना ७ महिन्याचा कालावधी लागला आहे.
उपकरणाच्या प्रमुख विशेषतः म्हणजे उपकरणाच्या पन्नास ते शंभर मीटर अंतराच्या आतील एखाद्या व्यक्तीने धुम्रपान किंवा मद्यपान केले असल्यास त्याची माहिती मशीन द्वारा लगेच कळते. या तंत्रज्ञानामुळे वातावरणातील प्रदूषित घटक शोधून प्रदूषित प्रभाग सुद्धा सिस्टीम डिस्प्ले करीत असते. दुषित वातावरणाची माहिती संबंधित व्यक्तीच्या ईमेल सिस्टमवर पाठविण्याची सुद्धा व्यवस्था या उपकरणात आहे. त्यामुळे आजूबाजूच्या दुषित वातावरणाची लागलीच माहिती मिळविता येऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी या तंत्रज्ञाचा वापर केल्यास त्याठिकाणी पूर्णपणे मध्यपान व धुम्रपानाला आडा घालू शकतो. महत्वाचे म्हणजे कायद्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान अथवा मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे मात्र तरीसुद्धा याच्यावर नियंत्रण ठेवणे प्रशासनाला कठीण झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी या उपकरणाच्या वापरामुळे व्यसन करणा-यांवर प्रतिबंध घालता येईल.
सध्या वातावरणात प्रामुख्याने वायुप्रदूषण खूप अधिक प्रमाणात होत आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताची राजधानी दिल्ली शहर. वायुप्रदूषण होत असल्यामुळे त्वचेचे विकार, श्वसनासंबंधी विकार दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे वाढत चालणारी वायुप्रदूषणाची ही समस्या कशा प्रकारे सोडविता येईल हा विचार लक्षात घेऊन हे संशोधन करण्यात आले. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रा. गणेश धनोकार यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, प्राचार्य. डॉ.ए.जी.मॅथ्यु, विभागप्रमुख प्रा.सोनल पाटील, प्रा.हिरालाल साळुखे, प्रा.स्वाती पाटील, प्रा.शितल जाधव यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.