रामरोटी आश्रमाच्या सेवा कार्यांचा एक तप पुर्ण : गोरगरिबांना किराणा साहित्याचे वाटप

0

मुक्ताईनगर ;- संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुक्ताईनगर शहरात अखंड 14वर्षांपासून संत- महापुरुषांच्या विचार कार्यावरील चालू असलेली मानव सेवा हिच ईश्वर सेवा हि सेवाभावी वृत्ती जोपासलेली पपु गुरुवर्य संत रामभाऊ पुजारीबाबा सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत रामरोटी आश्रमाव्दारे सालाबादप्रमाणे या वर्षी सुद्धा प्रत्येकी एक किलो सामान पिठी साखर, तेल, तुप, रवा, मैदा, बेसन पिठ, इ किराणा साहित्याची वाटप समाजातील वंचित निराधार गोर-गरीब 111 कुटुंबाला दिवाळी सणाच्या निमित्ताने अन्नदाते राजु साहेबराव पाटील शेमळदे,संदीप खरे (गणेश झेरॉक्स)डॉ. दिलीप तायडे, डॉ गणेश येवले, जि के महाजन , प्रदिप मधुकर चौधरी , के. डी पाटील प्रमोद भारंबे , मनोज देशमुख,व्यंकटराव आमोदे, संयम मेडिकल व सामाजिक बांधिलकीची जान असणारे ज्ञात अज्ञात दानवीरांकडुन आणी रामरोटी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करुन वाटप करण्यात आले. यावेळी महंत आजादगिरी महाराज, अध्यक्ष किशोर गावंडे बापु,सचिव राम टोंगे,उपाध्यक्ष गजमल पाटील,भगवान भोलाने सुभाष माळी, किरण महाजन, वसंता पाटील, सागर बडगुजर, बबलु माळी, प्रमोद कोळी प्रविण बडगुजर, व रामरोटी परिवारचे सेवक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.