राज्यसभेत पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीचे कौतुक !

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय परंपरांचे पालन करत राज्यसभेत चांगले वर्तन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजू जनता दल या पक्षांचे कौतुक केले. ‘राज्यसभेच्या २५० व्या अधिवेशनात सहभागी होणे हे माझं भाग्य आहे. संसद हे भारताच्या विकासयात्रेचं प्रतिबिंब आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि या सभागृहाने बदललेली परिस्थिती आत्मसात केली. सदनातील सर्व सदस्य अभिनंदन करण्यास पात्र आहेत’, असंही मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी राज्यसभेच्या २०० व्य़ा अधिवेशनाला संबोधित करताना कुणीही आपल्या सेकंड हाऊसला सेकंडरी हाऊस बनवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करता कामा नये, असे आवाहन केले होते. उत्तम संसदीय व्यवहारासाठी आज मी दोन पक्षांचा विशेष कौतुकाने उल्लेख करेन. ते पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजून जनता दल. हे दोन्ही पक्ष संसदीय मर्यांदांचे अतिशय काटेकोरपणे पालन करतात. त्यांचे सदस्य कधीही सभागृहातील वेलमध्ये उतरून गोंधळ घातल नाहीत. तसेच ते आपले प्रश्न अगदी समर्पकपणे उपस्थित करतात. इतर पक्षांनी त्यांच्याकडून ही बाब शिकण्यासारखी आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामो़डींच्या पार्श्वभूमीवरी नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे केलेले कौतुक चर्चेचा विषय ठरले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.