राजवड येथे इलेक्ट्रिक खांब पडल्याने एकवीस वर्षीय वायरमनचा मृत्यू

0

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील आदर्श गांव राजवड येथे काल रविवारी दुपारच्या सुमारास गावातील सिमेंटच्या इलेक्ट्रिक खांब्यावर काम करत असताना खांब अचानक तुटल्याने २१ वर्षीय वायरमानाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. निलेश गोपाल पाटील (वय २१रा, लष्कर गल्ली पारोळा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, दि. २३ रोजी राजवड गावातील ईलरक्ट्रिक काम करण्यास वायरमन नरेंद्र शिंदे व काँट्रॅक बेस वरील वायरमन निलेश पाटील हे गेले होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास राजवड गावातील एका सिमेंटच्या इलेक्ट्रिक खांबावर काम करण्यासाठी निलेश चढला असता खांब अतिशय जीर्ण व जुना असल्याने अचानक तुटल्याने निलेश खाली पडला व खांब त्याच्या अंगावर आल्याने त्याचा डोक्याला मार लागला. त्यास लगेच अमळनेर येथे डॉ अनिल शिंदे यांच्याकडे उपचार्थ नेले असता त्यांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली.

घटना झाल्यावर घटनास्थळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी पी, एम, पाटील, निसार तडवी, हर्षद वळवी, संदीप सोनवणे, महेश सूर्यवंशी, उदय पाटील, सागर गुढे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत पारोळा पोलिसात सलीम तडवी यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो कॉ सुनील वानखेडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.