रस्ते व गटारीसाठी गटविकास अधिकारी जामनेर यांना ग्रामस्थांचे निवेदन

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बु .  येथील रहिवासी यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करीत नागरी सुविधा यावर लक्ष केंदित करण्यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सन १९८५ पासून NA झालेल्या नवीन गावठाण परिसरातील नागरी वस्तीत आजपोवत कोणत्याही नागरी सुविधा झाल्या नसल्याने आज ३५ वर्षाचा पाढाच पंचायत समितीच्या दालनात मांडण्यात आला. सरपंच तथा ग्रामसेवक यांनी ४ वेळा रस्त्याची लांबी रुंदी मोजून देखील कोणत्याही स्वरूपात प्रत्यक्षात गटारी व रस्ते काँक्रेटी  करण करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

सदरील रस्त्यावर पावसाच्या पाण्याने ठीक ठिकाणी डबके तुंबलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने अनेक नागरिकांचे आरोग्य  धोक्यात आले आहे. याच मुद्याला धरून आज हिवरखेडा येथील गट नं  १३२ मधील नागरिकांनी पंचायत समितीच्या दालनात आपल्या नागरी सुविधेचा पाढा वाचला व गटविकास अधिकारी यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले. तसेच  गट नं १३२ मध्ये तात्काळ मुरुम व गटारी व रस्ते दुरुस्ती न झाल्यास समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायत हिवरखेडा यास कुलूप ठोकणार आहे. असा ग्रामस्थांकडून निर्वाणीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

गटविकास अधिकारी यांना निवेदन देतांना गोकुळ राजाराम झावरे, सुभाष विठ्ठल रोहिमारे, दत्तू भिला महाजन, ज्ञानेश्वर अनिल पाटील, बाळू पाटील, भाऊराव देवराम महाजन, संदेश सुभाष चौधरी, अरूण काशीराम महाजन, पप्पू भाऊराव महाजन, लक्ष्मण शिगारे, विजय श्रीकृष्ण पाटील, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.