रत्नापिंप्रीत घर कोसळून नुकसान

0

पारोळा | प्रतिनिधी

पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्रीत घराची भिंत कोसळून संसारोपयोगी वस्तूचे नुकसान झाले, याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील रत्नापिंप्रीत भाईदास नामदेव मराठे यांच्या राहात्या घराची भिंत अचानक कोसळून यात घरातील संसारोपयोगी वस्तू दाबल्या जाउन नुकसान झाले आहे, अचानक भिंत कोसळल्याने गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली, यात कोणी दाबले तर नाही याचा सर्व जण एकमेकांना विचारत होते, पंरतु सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नसल्याने सगळ्यांनी सुटकेचा स्वास सोडला, घरातील सदस्य शेतात गेल्या ने ही जिवितहानी टाळल्या चे सांगण्यात आले, तसेच शाळेला सुट्टी असल्याने लहान मुले ही मधल्या घरात जेवण करीत असताना त्यांना मोठा आवाज ऐकू आल्याने ते लगेच सर्व जण बाहेर पडाले घरच्या मागील काही भाग पडल्याने त्यात काही संसारोपयोगी साहित्याचे नुकसान मात्र झाले असून अचानक घडलेल्या या घटनेमुळे मराठे कुटुंबीय आजच बेघर झाले असून तलाठ्याने लवकरात लवकर याचा पंचनामा करून मराठे कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.