युपी : संत कबीरनगर जिल्ह्यात बीजेपीच्या आमदार आणि खासदारामध्ये हाणामारी

0

संतकबीरनगर | लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तर प्रदेशमधील संत कबीरनगर जिल्ह्यात बीजेपीच्या आमदार आणि खासदारामध्ये हाणामारी पाहायला मिळाली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रकार घडला.
उत्तर प्रदेशातली एका प्रकल्पाच्या शिलान्यासात आपलं नसल्याबद्दल भाजप खासदार शरद त्रिपाठी यांनी भाजप आमदार राकेश सिंह यांना जाब विचारला होता. यामुळे राकेश सिंह भडकले. त्यानंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालेलं पहायला मिळालं.

Leave A Reply

Your email address will not be published.