‘या’ 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र शेकोटया देखील पेटलेल्या आहेत. अशातच आता राज्यात पुन्हा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि त्याचा परिणाम म्हणून चक्रीवादळ 26 पासून वायव्य भारतावर आणि 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर प्रभाव टाकण्याची दाट शक्यता आहे.

राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल तर हलका ते मध्यम पाऊस स्वरूपाचा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वारा ताशी 30-40 किमी वाहण्याची शक्यता आहे.

27 डिसेंबरला विर्दभात तुरळक ठिकाणी हलका पावसाची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे. 27 ते 29 डिसेंबर दरम्यान मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.