यावल वन विभागाच्या कारवाईत 13 घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त

0

जळगाव– यावल वन विभागाच्यावतीने 10 मार्च, 2021 रोजी वनसंरक्षक, धुळे (प्रादेशिक), डी. डब्लु. पगार व उप वनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव पद्मनाभा एच.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा व्ही.एच.पवार यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व्ही. व्ही. कुटे व वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा (प्रादेशिक) डी. एच. लोंढे व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासह शेख मुखतार शेख युसुफ रा. मन्यार मळी, हमीद नगर, चोपडा येथे गोपनीय पद्धतीने अचानक सकाळी 10 वाजता वरीष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जावून आकस्मित धाडसत्र राबिवले.

या धाडसत्रात बाभूळ, निलगीरी, निम व इतर असे एकूण 13 घनमीटर माल आढळून आल्याने तो जप्त करुन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे जमा केला. तसेच 18 इंच व्यासाचे विना परवाना उभे आरायंत्र आढल्याने सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या समक्ष व वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व वनपरिक्षेत्र अधिकारी, चोपडा (प्रादेशिक) यांच्या उपस्थितीत नियमांनुसार पंचनामा करुन ते जप्त करण्यात येऊन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही केल्याने अवैध लाकूड व्यापारी तथा व्यवसायीकांमध्ये दहशत तयार झालेली असून या कार्यवाहीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आली. या कार्यवाहीनुसार वनगुन्हाची नोंद घेत पुढील तपास सुरु आहे. असे यावल वन विभागामार्फत कळविण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.