यावल वन विभागकडून सागवानी लाकूड साठा जप्त

0

यावल, दि. १३ –
यावल वन विभाग गस्ती पथका कडून 10 रोजी रात्री 10.30 च्या सुमारास गुप्त बातमीने यावल येथील कोरपावली रस्त्याने विट भट्टी जवळ 1 अज्ञात इसम दुचाकी वरून सागवान लाकडाची वाहतूक करीत असताना दिसल्यावरून त्याला वन विभागाकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी मुद्देमाल टाकून पसार झाला. साग मुद्देमाल-06 नग, घन मीटर-0.108, किंमत-4183/- शासकीय वाहनाने यावल डेपोत पावतीने जमा करण्यात आला. त्यानंतर दिनांक-11/12/2018 रोजी मिळालेल्या गुप्त बातमीने दुपारी 14:30 वा आडगाव ते मनुदेवी जाणार्‍या रस्त्याच्या डावी बाजूस जुना प्लॉट भागातील पडीत गोठयात पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.