यावल राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाकडून योगी सरकारचा निषेध

0

यावल (प्रतिनिधी)  शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग यावल तालुक्याच्यावतीने उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार व अत्याचाराचा निषेध करून युपीचे योगी सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती शासन लागू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजीक न्याय विभागाकडून करण्यात आली आहे.

युपीतील हाथरस या ठिकाणी झालेल्या बलत्कार- हत्या करून घटनेतील आरोपींना योगी गुंडाराज सरकार पाठीशी घालत असल्याच्या आरोप यावेळी करण्यात आला. तसेच योगी सरकार बद्दल अनेक तक्रारी करण्यात आल्या असुन उतरप्रदेशातील गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या योगी सरकार तात्काळ बरखास्त करून राष्ट्रपती शासन उतरप्रदेशात लावण्यात यावे अशी मागणी यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली. तसेच संपुर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या गुन्ह्यातील आरोपींचा खटला फास्ट ट्रॅक न्यायलयात चालविण्यात यावा व यातील गुन्हेगार नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.