यावल पोलीसांनी पकडला वाळुची बेकाद्याशीर वाहतूक करणारा डंपर ; वाहनचालका विरूद्ध गुन्हा दाखल

0

यावल ( प्रतिनिधी) : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या बेकाद्याशीर विनापरवाना वाळुची चोरटी वाहतुक करण्यात येत असुन, पोलीसांनी पन्द्रहा दिवसात दुसऱ्यांदा पकडले वाळुची वाहतुक करणारे डंपर पकडल्याने चर्चेला उधाण आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी आज २ नोव्हेंबर रोजीच्या रात्री १ वाजेच्या सुमारास यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटवर गस्तीवर असलेल्या यावल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नितिन चव्हाण यांनी एमएच १९ सिवाय ८१८१या क्रमांकाच्या डंपर या चार चाकी वाहनातुन चालक बाशन युवराज कोळी वय२५ वर्ष राहणार डांभुणी तालुका यावल हे विनापरवाना वाळुची वाहतुक करतांना आढळुन आले असुन, पोलीसांनी सुमारे ५ लाखाहुन अधिक किमतीचा डंपरला ताब्यात घेतले असुन, वाहनचालका विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

अशा प्रकारे वाळुची चोरटी वाहतुक करतांना वाहन ताब्यात घेतल्याची ही दुसरी घटना असुन, महसुल प्रशासनाचे या अवैद्य मार्गाने मोठया प्रमाणावर यावल शहरात व परिसरात विविध वाहनातुन विनापरवाना वाळुची चोरटी वाहतुककडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाळुची तस्करी करणाऱ्यांना चांगलेच फावले असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.