यावल तालुक्यात ग्रा.पं.निवडणुकीत आ.शिरीष चौधरींच्या नेतृत्वात काँग्रेसने केले वर्चस्व सिद्ध

0

फैजपूर प्रतिनिधी: यावल तालुक्यात झालेल्या ग्राम पंचायतच्या सार्वत्रीक पंचवार्षीक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मित्रपक्ष कॉंग्रेसने आपला बालेकिल्ला आबाधीत ठेवला आहे .दिनांक १५ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत४६ पैकी जवळपास २७ ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला असुन तिन ग्रामपंचायतवर शिवसेनेला सत्ता मिळाली असुन ५ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व राखले आहे. ८ ग्रामपंचायतीवर भाजपा प्रणीत पॅनलने विजय मिळवला असुन इतर ग्रामपंचायतीवर समिश्र विविध पक्षाचे उमेदवार विजय झाले आहे. दरम्यान यावल तालुक्यातील राजकारणाचे समिकरण बदलणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल समोर आले आहेत. काँग्रेसचे जेष्ठ माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांनी आपले वर्चस्व ग्रामपंचायतीवर कायम राखले आहे.तर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी सभापती डॉ.नरेंद्र कोल्हे यांच्या पॅनलला बामणोद येथे पराभवाचा सामना करावा लागला असुन त्यांच्या पत्नी व सुन यादेखील पराभुत झाल्या आहेत.तर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराम तायडे यांच्या पॅनलला १५ पैकी १३ जागा एकहाती मिळाल्या असून त्यांच्या घरातील तीन उमेदवार निवडून आले आहेत.तर भालोद येथे स्व.हरीभाऊ जावळे यांच्या पश्चात पहिल्याच निवडणुकीत भाजपला पुर्ण बहुमत मिळाले आहे.यावल पं.स.पल्लवी चौधरी यांचे पति व डांभुर्णीचे विद्यमान सरपंच पुरुजीत चौधरी यांनी देखील विजय मिळवला आहे.तर मारुळ येथे देखील काँग्रेसला आपला गड राखण्यात यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.