मोहन भागवत यांचं राष्ट्रवादासंबंधी मोठे विधान !

0

रांची : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रवादासंबंधी मोठे विधान केले आहे. राष्ट्रवाद या सारख्या शब्दांतून नाझी व हिटलरची प्रतिमा झळकते, असे मोहन भागवत यांनी म्हंटले आहे. झारखंडमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.


मोहन भागवत म्हणाले कि, राष्ट्रवाद हा शब्द वापरण्याचे टाळा. राष्ट्र म्हणाले तर चालेल. राष्ट्रीय म्हणाले तरी चालेल. राष्ट्रीयत्व हा शब्दही चालेल. मात्र, राष्ट्रवाद म्हणू नका कारण यासारख्या शब्दांतून नाझी व हिटलरची प्रतिमा झळकते, असा सल्ला त्यांनी आरएसएच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.ते पुढे म्हणाले, भारताला जगाचे नेतृत्व करण्याचा विचार करायला हवा. देशाची एकता हीच खरी ताकद आहे. देशात भलेही कितीही धर्म असतील, मात्र प्रत्येक व्यक्ती एकाच शब्दाने जुडलेला आहे, तो म्हणजे हिंदू. हा शब्द देशाची संस्कृती जगाला दाखवतो. संघ देशातील विस्ताराबरोबरच हिंदुत्वाच्या अजेंड्यावर पुढे जात राहणार आहे, जो देशाला जोडण्याचे काम करेल, असेही भागवत यांनी म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.