मोदी सरकारचा मोठा निर्णय ! अडकलेल्या लोकांसाठी विशेष ट्रेन सोडणार

0

नवी दिल्ली : कोरोना च्या पार्श्भूमीवर देशभरात लॉकडाउन सुरू आहे.  या देशव्यापी लॉकडाउनमुळे देशातील विविध राज्यांमध्ये हजारो स्थलांतरीत मजूर अडकले आहेत. अशा अडकलेल्या मजुरांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अडकलेल्या या नागरिकांसाठी विशेष ट्रेन चालवण्याला मोदी सरकारने परवानगी दिली आहे.

लॉकडाउनमुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या कामगार, भाविक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आंततराज्य प्रवासासाठी मुभा दिल्यानंतर मोदी सरकारने अडकलेल्या मजुरांसाठी विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ही ट्रेन सेवा सुरु करण्यात येणार आहे. ट्रेन सेवा सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारांमध्ये समनव्य राहावा यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.

तिकिटांच्या विक्रीसंबंधी रेल्वे मंत्रालय सविस्तर माहिती देईल असं आदेशात सांगण्यात आलं आहे. तसंच ट्रेन आणि स्थानकांवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्यासंबंधी तसंच सुरक्षेच्या इतर उपाययोजनांबद्दलही रेल्वे मंत्रालयाकडून सूचना जारी करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.