मुलींचे शिक्षण हेच समाजाचे रक्षण…

0

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रासंगिक लेख

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना आजच्या दिनी प्रथमतः अभिवादन.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 3 जानेवारी हा दिवस मबालिका दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.
मजिच्या हाती पाळण्याची दोरी
ती जीवनाला उद्धारीफ
हे त्याकाळी महात्मा ज्योतिबांना उमगले अन् त्याचं फलित म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील स्त्रियांची गगनभरारी होय . नेवासे पाटलांच्या पोटी जन्माला आलेल्या सावित्रीबाईंच्या शिक्षणाने अख्खा स्त्री जीवन प्रकाशमय होईल हे ज्योतिबांनी जाणले होते. मुलींचे शिक्षण हे समाजाचे रक्षण असं भाकीत आज खरं होताना दिसत आहे. म्हणूनच शिक्षणाची सुरुवात बालिकेपासून होणे ही काळाची गरज आहे. आज प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियाही आघाडीवर राहून कार्य करीत आहेत.
जेथे स्त्रियांचा आदर केला जातो तेथे देवतांचाही वास असतो जेथे त्यांचा सन्मान होत नाही तेथे सारी कर्मे निष्फळ होतात.भारताची एवढी उज्वल परंपरा असून आज सर्वत्र स्त्री असुरक्षित आहे. याची प्रचिती अनेक घटनांतून, वर्तमानपत्रातून आपण वाचतो. मनुस्मृतीच्या काळापासून स्त्रियांच्या स्वांत्र्यावर अनेक बंधने आली होती. मनुच्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र मचूल व मूल मएवढ्यासाठीच बनले होते. दुबळी अबला अशी ही तिची हेटाळणी केली जायची. या अमानुषतेविरूध्द कुणी ब्र शब्द काढला तरी सनातनी धर्ममार्तंडानी त्यांच्यावर एखाद्या जंगली श्वापदासारखी तुटून पडत असत. अश्या या मूजोर धर्मांधतेने वागणार्यांना कोण अडवणार?
तुका म्हणे उगी रहावे
जे जे होईल ते ते पाहावे
अशीच वेळ आपल्या समाजात निर्माण झाली होती.
पशु क्षुद्र नारी ऐ सब है , ताडण के हारी
या मनुच्या उक्तीला तडा देणारी,मानवतेला काळीमा फासणारी, सनातनी धर्ममार्तंडांना त्यांची जागा दाखविणारी , स्त्रियांच्या अन्यायाला, अत्याचाराला वाचा फोडणारी,सबल स्त्री समाज निर्माण करणारी समाजसुधारकांची एक नवी पिढी पुढे आली. …आणि
मआकाशातील तळपता तारा होणे कदाचित तुम्हाला शक्य नसेल पण अंगणातील दिवा होऊन भोवतालचा परिसर उजळणे मात्र मुळीच अशक्य नाही.फ
असा संदेश देणारे विनोबा भावे, महर्षी केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले,राजा राममोहन रॉय या दीपस्तंभांनी आपल्या विचारांतून व कृतीतून ममुलींचे शिक्षण हे समाजाचे रक्षण आहे महे सत्यात उतरवून दाखविले. समाजात स्त्रियांना स्वाभिमानाने, सन्मानाने जगण्याचा महामंत्र दिला. ही स्त्री राजवाड्यापासून ते झोपडीमध्ये कोंडलेली होती. आज समाजसुधारकांमुळे पंतप्रधान पदांपासून ते सरपंच होतांना प्रत्येक क्षेत्रात ज्ञानाने, परिश्रमाने जिद्दीने गरूडझेप घेत आहेत. उदा.पाकीस्तानची कन्या युसूफजाई मलाला अवघ्या 16 वर्षाची तिने एक नव्या मार्गाचा आदर्श घालवून दिला. तलवारीच्या धारदार पात्यापेक्षाही पेनींची, लेखणीची ताकद श्रेष्ठ व प्रभावी आहे हे सत्यात उतरवून दाखविली. मुलींच्या शिक्षणासाठी तालिबानच्या विद्रोहाला सामोरे जात गोळी झेलली.मरणाच्या दारातून जी परत आपल्या ध्येयाप्रत पोहचण्याचे प्रयत्न करते हे समाजाचे रक्षण नव्हे का?केवळ मलालाच नव्हे तर बलात्कारास बळी पडलेली लखनौची मउषा विश्वकर्माफ या परिस्थितीतून सावरत मुलींसाठी मार्शल आर्टचं शिक्षण देणारी मरेडब्रिगेड संघटनाफ स्थापन करून समाजाचं रक्षण करते हे मुलींचे समाजाचे रक्षणच होय.
अ‍ॅसिड हल्यात विद्रुप झालेली लक्ष्मी आपला चेहरा झाकणं नाकारून समाजाच्या भेसूर चेहर्यावरला बुरखा ओरबाडून काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन मडढजझ -उखऊ -ढढ-उघफ कायदा मंजूर करणार्‍या मुलीच आहेत. त्याही एकप्रकारे समाजाचं रक्षण करीत आहेत.
अशा प्रकारच्या अनेक अत्याचाराविरूद्ध घुसमटलेल्या संतापाला शब्द आणि कृती देणार्‍या, देशाची दशा आणि दिशा बदलावयाला सरसावलेल्या ह्या सामान्य मुलींनी एक असामान्यत्व सिद्ध केलं..एक नवं पाऊल..एक नवं वास्तव..एक नवी ओळख निर्माण केली आहे. या सर्वांचा आदर्श आपण नेहमी डोळ्यासमोर ठेवून खरंच मुलींचं शिक्षण हेच समाजाचं रक्षण होय असं अभिमानाने व छातीठोकपणे आजच्या बालिका दिनी सांगावेसे वाटते.
लक्ष न ओझल होने पाये
कदम मिलाकर चल
सफलता तेरे कदम चुमेगी
आज नही तो कल!
मुलींचे शिक्षण हे समाजाचं रक्षण
देवू या प्रत्येक सुकन्येला संरक्षण !! आजच्या दिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.

Leave A Reply

Your email address will not be published.