मुक्ताईनगर येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

0

मुक्ताईनगर : शहरात राहणारा तरुण शेतकरी सचिन तुळशीराम मनसुटे याने 11 जानेवारी रोजी दुपारी 11:30 यांचे सुमारास आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे सचिन याच्यावर अल्पबचत गटाचे व खासगी सावकारांचे कर्ज होते शेतीमधील नुकसानीपोटी त्याच्यावरही कर्ज झाल्याची माहिती मिळत आहे.

नितीन तुळशीराम मनसुटे यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस करत आहेत.त्याच्या पश्चात आई वडील भाऊ वहिनी पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे.

अतिशय गरिबीच्या व हालाखीच्या परिस्थितीत शेतीचे काम सचिन हा करत होता समाजामध्ये सर्वांशी मिळून जोडून वागणारा सचिन निघून गेल्याने तेली समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान कर्जबाजारीपणा तून त्याने आत्महत्या केली असल्याने शासकीय मदत मिळण्याची अपेक्षा नातेवाईकांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.