मुक्ताईनगर मतदार संघातील धरण ग्रस्त रहिवासी घरांचे अतिक्रमण कायम करणार

0

बोदवड (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर मतदार संघातील प्रकल्प बाधित शहराच्या चहुबाजुला असलेल्या नागरीकांच्या सरकारी जागेवरील रहिवासी घरे कायम करण्यासाठी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपविभागीय अधिकारी भुसावळ आणि तालुक्यातील संबंधित अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की,मुक्ताईनगर हे हतनूर धरणाच्या उभारणी साठी प्रकल्प बाधित तालुक्याचे शहर आहे.शहर आणि तालुका तसेच प्रामुख्याने या विधानसभा मतदारसंघाचे राजकारणात हा अतिक्रमणाचा मुद्दा गेले २५ वर्षां पासून अनेकांना तारुन गेला होता.आता मात्र मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी या पुढे हा मुद्दाच या मतदार संघाचे राजकारणातून कायमचा बाद करण्याचा निश्चय केला आहे.त्यामुळे यापुढे या मतदार संघात अतिक्रमणाचे मुद्दे चघळू पाहणा-यांच्या राजकारणाला पुर्ण विराम मिळणार असल्याचे यावेळी सांगितले.कारण आ.चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथील शासकीय जागेवर रहिवासी निवा-याची घरे बेघर परिवारातल्या लोकांना त्यांच्या नावे कायम करण्यासाठी मुक्ताईनगर चे तहसीलदार शाम वाडकर यांचे कार्यालयात प्रत्यक्ष चर्चा करून संबंधित शासकीय अधिकारी आणि जिल्हा स्तरावरच्या अधिकारी यांच्या सदर बैठकीचे आयोजन दि.१८ मार्चे रोजी केले आहे.या विषयावर विधान सभेच्या अधिवेशनात चर्चेत चुकीची माहिती सभागृहात समोर आल्याचे खात्याचे मंत्री व पीठासीन अधिकारी यांच्या लक्षात आ.पाटील यांनी ही बाब आणून दिली त्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील आणि हतनूर धरणाचे लाभक्षेत्रातील अशा सरकारी जागेवरील सर्व बेघर परिवाराची घरे कायम नावावर लावण्यासाठी आ.पाटील यांनी कंबर कसली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.