मुक्ताईनगर तालुक्यात दोन अकस्मात मृत्यू

0

मुक्ताईनगर :- तालुक्यातील खामखेडा शिवारातील एका लिंबा च्या झाडाला 38 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दहा वाजून 40 मिनिटांनी उघडकीस आली.

याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथील पोलीस पाटील किरण वासुदेव गवते यांनी पोलिसात दिलेल्या खबरी तर म्हटले आहे की खामखेडा येथील 38 वर्षीय सुरेश त्र्यंबक पाटील यांचा मृतदेह खामखेडा शिवारातील टि.के.पाटील यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर घटना आज सकाळी दहा वाजून 40 मिनिटांनी उघडकीस आली. मृत्यूचे कारण समजू शकले नाही.दरम्यान याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष चौधरी हे करीत आहेत.

तर दुसरी घटना मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथे घडली त्यात 55 वर्षीय व्यक्ती स्वतःच्या घरात मृत झालेला आढळून आला सदर घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.

दरम्यान याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथील रविंद्र तारासिंग पाटील यांनी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, फिर्यादी चे वडील तारासिंग फुलसिंग पाटील (वय 55 वर्षे ) हे सारोळा येथील स्वतःच्या घरात मयत  आढळून आले. सदर घटना दुपारी साडे चार वाजेला उघडकीस आली याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.