मुंबई, दिल्ली, गोवा अलर्टवर : दहशतवादी हल्‍ल्‍याची शक्‍यता

0

नवी दिल्ली – दिल्ली, मुंबई व गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याचा आयएस आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला घडवण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली, मुंबई, गोवा पोलिसांना अटर्ल जारी केला आहे.

या संभाव्य हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांना विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयएस या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता अबु हसन अल-मुहाझीर याची न्यूझीलंडमधील हल्ल्याचा बदला घेण्याचे आवाहन करणारी एक ऑडिओ क्लिप दहशतवाद्यांचे ऑनलाइन ग्रुप आणि विविध चॅट प्लॅटफॉर्मवर वितरित करण्यात आली आहे. या ऑडिओ क्लिपसह दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनीही असा बदला घेण्याला दुजोरा दिलेले व्हिडिओही दहशतवाद्यांमध्ये फिरत आहेत.

दरम्यान, शहरातील विविध धार्मिक स्थळांभोवतीची सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच गोव्यातील संभाव्या हल्ले विशिष्ट ठिकाणी केली जाणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. मात्र, माहितीत उल्लेख असललेल्या ठिकाणांव्यरिक्त इतर महत्त्वाच्या ठिकाणांवरही पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.