मालवाहु टेम्पोच्या धडकेत इसमाचा जागेवरच मृत्यू

0

पाचोरा (प्रतिनिधी) : मालवाहु टेम्पोने एका पादचारी ४५ वर्षीय इसमास जोरदार धडक दिल्याने पादचाऱ्याचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने टेम्पो चालकास ताब्यात घेण्यात असुन त्याचे विरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रताप शिवाजी पाटील (रा. देशमुखवाडा,भडगाव) हे चाळीसगाव येथे पोलिस विभागात सेवा बजावतात. त्यांची दि. २१ रोजी रजा असल्याने ते त्यांचे मित्र सुनिल रघुनाथ देशमुख यांचे सोबत सकाळी ८ वाजेच्या सुमारास आपलामित्र प्रकाश भोई यास विघ्नहर्ता हॉस्पिटल, पाचोरा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यास पाहण्यासाठी प्रताप पाटील व सुनिल देशमुख दोघे कार  (क्रं. एम.एच. -१९ – सी व्ही – ७५५५) ने भडगाव येथून पाचोरा आले. व भोई यास हॉस्पिटलमध्ये भेटून कारने पाचोरा येथून परत भडगावकडे जात असतांना अंतुर्ली फाट्याजवळ भडगावकडून पाचोराकडे येणाऱ्या मालवाहू टेम्पो (क्रं. एम. एच. – ११ – ए. एल. ५१२६) वरील चालकाने ता.पाथर्डी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका ४५ वर्षीय पादचाऱ्यास जोरदार धडक दिली. या धडकेत अनोळखी पादचाऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. प्रताप पाटील यांच्या सतर्कतेने टेम्पो चालकास टेम्पो सहीत ताब्यात घेण्यात येवुन पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रताप पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केल्याने पाचोरा पोलिसात टेम्पोचालक संदीप भाऊसाहेब पालवे (रा. मिसाळवाडी, कोल्हार,जि. अहमदनगर) विरुद्ध कलम २७९, ३०४ (अ),१८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल हंसराज मोरे करीत आहेत. मयत अनोखी पादचाऱ्याची ओळख पटविण्याचे आवाहन हंसराज मोरे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.