मारहाण करुन लुटणार्‍या चार भामट्यांना तासाभरात अटक

0

जळगाव :- शहरातील निमखेडी शिवारात जुना हायवे परिसरात अशोक बेकरीजवळ काल सायंकाळी 5.30 वाजता एकाला मारहाण करुन त्याच्याजवळील रोख 5 हजार 200 व 16 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेणार्या 4 आरोपिंना पोलिसांनी गुन्हा दाखल होताच एका तासात अटक केली आहे व अन्य आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.
गुणवंत उर्फ सागर संजय चव्हाण हे काल सायंकाळी 5.30 वाजता जुना हायवे परिसरात निमखेडी रोडवरील अशोक बेकरीजवळ असतांना त्यांना बापु उर्फ पांडुरंग पाटील, अजय सपकाळे, संजय राठोड, आकाश नन्नवरे यांच्यासह पाचव्या अनोळखी आरोपीने मारहाण करीत त्यांच्या डोक्यात दगड मारुन आधी जखमी केले. नंतर त्यांच्याजवळील रोख 5 हजार 200 व 16 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पलायन केले होते. गुणवंत चव्हाण सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांनी दिलेल्या जबाबानुसार या आरोपिंविरोधात भादवी कलम 395, 323, 324 गु र नं 100/19 नुसार जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच एका तासाच्या आत पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशानुसार पिएसआय. कदीर तडवी, हे कॉ. जितेंद्र पाटील, पो.ना. प्रितम पाटील, सुशिल पाटील, भारत पाटील, प्रफुल्ल धांडे यांनी पान 4 वर

Leave A Reply

Your email address will not be published.