“माझा बांध माझे झाड”योजनेअंतर्गत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार

1

अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना अमळनेर गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, अमळनेर तालुक्यात माझा बांध माझं झाडं अभियान सुरू करण्यात आले.

या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात बांधबंदिस्ती करण्यात येणार असून बांधावर आंबा,चिंच,साग,बांबू आणि इतर प्रकारच्या चोवीस झाडांची लागवड केल्यास प्रति झाड 570रूपये वृक्षसंगोपण करण्यासाठी मजूरीच्या व कुशल निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहेत.माझा बांध माझं झाडं या अभियानाच्या माध्यमातून मृदा व जलसंधारणाबरोबरच पर्यावरण संवर्धन होणार असून यामाध्यमातून ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचे सन 2022पर्यंत शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि आदरणीय शरद पवार साहेबांचे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतीची कामे सामाविष्ट करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी बांधबंदिस्तीची आणि शेतात व बांधावर वृक्षरोपण करण्यासाठी आपल्या नावाचा नरेगा आराखड्यात समावेश करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा.

1 Comment
  1. श्री काका साहेब अन्ना शाहेब patil says

    ग्राम्पञ्चयत नरेगा उदसिन आहे

Leave A Reply

Your email address will not be published.