माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पाच वर्षाची शिक्षा

0

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि गुलाबराव देवकर यांना धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. सुरेशदादा जैन यांना 7 वर्षाची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील 30 नगरसेवकांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

जळगाव घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी  तत्कालीननगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास इ.स. १९९९ मध्ये सुरुवात झाली. मात्र या
योजनेतील सावळागोंधळ सन २००१ मध्ये समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार उघडकीला आले.

Leave A Reply

Your email address will not be published.