माजी मंत्री आ. गिरीश महाजनांनी दाखल केलेल्या याचिकेवर २७ रोजी सुनावणी

0

जळगाव प्रतिनिधी । अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर २७ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

 

मराठा विद्याप्रसारक संस्था हडपण्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह नीलेश भोईटे व नातलगांनी पुण्यात डांबून मारहाण केली. खोटे गुन्हे दाखल न करण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी घेतली, अशी फिर्याद अॅड. विजय पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार नुकताच कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

 

ही फिर्याद रद्द करण्यात यावी यासाठी गिरीश महाजन, रामेश्वर नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व एम. एस. कर्णीक यांच्या न्यायालयात गुरुवारी ही सुनावणी होणार होती. परंतु, काही कारणास्तव ही सुनावणी होऊ शकली नाही. आता २७ जानेवारी रोजी ही सुनावणी होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.