माजी नगराध्यक्षच्या वतीने श्रीराम मंदिरास १ लाख ६१ हजाराचा निधी

0

पारोळा (प्रतिनिधी) : अनेक शतका पासुन प्रलंबित असणाऱ्या अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी जगभरात सुरू असलेल्या निधी संकलनास पारोळा शहरात उत्तुंग असा प्रतिसाद मिळताना दिसतोय.

या समर्पणाला आपल्या आनंदी क्षणाची जोड देऊन आपले योगदान देण्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. यात पारोळा येथिल उद्योगपती व माजी नगराध्यक्ष  आबासो  गोविंद एकनाथ शिरोळे  तसेच  तात्यासो चंद्रकांत शिरोळे आण्णासो विकास शिरोळे  यांनी या महान कार्यास सावित्री फायर वर्कस च्या माध्यमातुन रूपये १६१६१६  एक लाख एकसष्ठ हजार सहाशे सोळा रुपयाचा धनादेश देऊन या मंदिर निर्माण कार्यास हातभार लावला.

या प्रसंगी श्रीराम मंदिर निधी संकलन समितीचे  अॅड,दत्ताजी महाजन,मा,नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा,आकाश बडगुजर,रविंद्र पाटील,मुकंदा चौधरी,सचिन गुजराथी,विनोद हिंदुजा,समिर वैद्य,धिरज महाजन,यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते,

Leave A Reply

Your email address will not be published.