महिलेस शिवीगाळ : रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशीविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ (प्रतिनिधी) :- महिलेस अश्‍लील शिविगाळ केल्याप्रकरणी रीपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशीसह दीपक सूर्यवंशी व सोबतच्या अन्य तिघा अनोळखींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

२७ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास निधी गौरव वाघ शारदा बिल्डींग, शिवाजी नगर, भुसावळ,त्यांच्या सासू रेखा वाघ व जेठाणी नेहा नितीन वाघ यांना संशयीत आरोपींनी अश्‍लील शिवीगाळ करीत फिर्यादीच्या पतीला जिवंत ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीचे पती गौरव वाघ हे प्रभागात चांगले काम करतात व ते सूर्यवंशीविरुद्ध उभे राहतील या कारणावरून आरोपींनी अश्‍लील शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्‍याचे एएसआय अनिल अडकमोल हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.