महिलेचा विनयभंग करुन पतीसह भावाला मारहाण

0

भुसावळ | प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानका परिसरातील एटीएम वरुन पैसे काढून भावासह पतीला भेटून परतणार्‍या महिलेचा विनयभंग करुन पतीसह भावाला मारहाण केल्याची घटना दि. ४ रोजी पहाटे घडली.
बाजारपेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विवाहिता आपल्या भावासोबत रेल्वे स्थानक परिसरातील एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेली होती. तेथून परततांना रिक्षाचालक पतीला भेटत असतांना संशयित आरोपी गुड्डू व शोएब (दोघांचे पूर्ण नाव माहित नाही) यांनी विवाहितेचा विनय भंग करुन जावेद पटेल व अफाक पटेल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी समजावत असतांना रिक्षांची तोडफोड करुन पसार झाले. याबाबत बाजारपेठ पोलिसात महिलेच्या फिर्यादीवरुन गु.र.नं. १६६/१९, भा.दं.वि.३५४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास बाजारपेठ पोलिस करित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.