महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय आढावा बैठक उत्साहात

0

प्रदेश अद्यक्ष अनिल महाजन यांच्या उपस्थित महाबैठक संपन्न

भडगाव :- महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यकार्यकारणी आढावा बैठक प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विश्वस्तांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात करण्यात आली.बैठकीचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते अनिल महाजन यांची निवड करण्यात आली.त्यानंतर महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.सीमेवर शहीद झालेल्या जवानांना व आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

महासंघाचे प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर, गाव,विभाग या सर्व पदाधिकाऱ्यांचे कॅडर बेस कार्यकर्ते तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.दर तीन महिन्यांनी प्रत्येक विभागाचे वेगवेगळ्या ठिकाणी सर्वांच्या सोई नुसार कॅडर कॅम्प घेण्यात येणार आहेत.तसेच महिला आघाडीची संघटन बांधणी अजून मजबुत करण्यावर भर देण्यात येणार आहे.महासंघाचे जास्तीत जास्त सदस्य नोंदणीअभियान राबविण्यात येईल.माळी समाजात सर्वांत जास्त शेतकरी वर्ग असल्यामुळे कृषी खात्याकडून यांना जास्तीत जास्त योजनां मिळाव्यात या साठी महासंघाच्या वतीने शासनाने कडे पत्र व्यवहार करण्यात येईल.तसेच राज्यात माळी समाजातील सामाजिक व राजकीय  क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते व यांच्या परिवारावर काही समाज कंटकाकडून हल्ले होत आहे.यांना मारहाण होत आहे.राजकीय वादातून माळी समाजातील कार्यकर्त्यांचा  बळी दिला जात आहे .अशा काही नीच प्रवृत्तीच्या लोकांचा महाराष्ट्र माळी समाज महासंघा तर्फे निषेध करण्यात आला व संबंधितावर कडक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या मुख्य कार्यालयासाठी व माळी समाजाच्या वसतिगृह बांधण्यासाठी मुंबई येथे मध्यवर्ती ठिकाणी सरकारी जागा नाममात्र भाडे पट्ट्याने सरकारने उपलब्ध करून दयावी या मागणीचा ठराव पास करण्यात आला.

आगामी विधानसभा निवडणुकी मध्ये सर्व पक्षीय व काही अपक्ष म्हणून माळी समाजाची व्यक्ती विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी उभे राहिल्यास त्यांना त्या त्या ठिकाणी महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या उमेदवारांचे सामाजिक योग्यदान बघून यांना जास्तीत जास्त समाजाचे मतदान मिळवून दयावे.व त्यांना मदत करावी.ज्या उमेदवाराचें सामाजिक योगदान काही नसेल.समाज कार्यात कुठेही दिसत नसेल.अशा उमेदवारास समाजाने मतदान करू नये मग तो कोणत्याही पक्षाचा असो.

आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांना सूचित करण्यात येते की,आपआपल्या पक्षातील माळी समाजाची व्यक्ती ना जास्त ठिकाणी विधानसभेची  उमेदवारी दयावी उमेदवारी देतांना त्या व्यक्तीचे सामाजिक योगदान तपासून ही व्यक्ती समाज कार्यात किती सहभागी आहे हे बघावे नंतर पक्षाचे तिकीट द्यावे किंवा राज्यभरात माळी समाजाची सर्वात मोठे समाजहितासाठी काम करणारी  सामाजिक संघटना म्हणजे महाराष्ट्र माळी समाज महासंघ या संघटनेच्या प्रमुख पधाधिकार्यांना  विचारून राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्याला माळी समाज बांधवाला विधानसभेची उमेदवारी दयावी तरच माळी समाजाचे मतदान यांना मिळेल.

सर्व राजकीय पक्ष माळी समाजाकडे दुर्लक्ष करत आहे.सरकारही दुर्लक्ष करत आहे.या साठी समाजाच्या सर्व स्थानिक संघटना,पंच मंडळे यांना महाराष्ट्र माळी समाज महासंघात जोडून घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.सर्व समाज एकत्र आला तरच समाजाचा विकास शक्य आहे.

महासंघाच्या ११ विश्वस्त मध्ये व प्रदेश कमिटीच्या प्रमुख पदधिकाऱ्यांमध्ये  ४ जण मिळून एक झोन प्रभारी प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली आहे.महाराष्ट्रातिल ३६  जिल्हे हे ८ झोन मध्ये संघटन बांधणीसाठी झोन प्रभारी नियुक्त करण्यात आले.या झोन प्रभारीनि आपल्या कडे असलेल्या जिल्हा,तालुका पदाधिकारी यांना सोबत घेऊन महासंघाचे संघटन कॅडर तयार करावे व कार्यकारणी तयार करावी.झोन प्रभारी नियुक्ति झालेल्या सर्वांची यादी सोबत जोडण्यात येत आहे.एक वर्षभराच्या आत  संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या कार्यकर्त्याचे कॅडर उभे करण्यात यावे असे यावेळी प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन यांनी बोलताना सांगितले.

समाज संघटन हे कशासाठी हवे सामाजिक , राजकीय कार्य करतांना अनेक अडी-अडचणी येत असतात.अनेक संकटाना सामोरे जावे लागते.काही समाज कंटाकानकडून जातीभेद होतात.माळी समाजातील लोकांना खोट्या केसेस मध्ये अडकवले जाते.मारहाण होते अश्यावेळी माळी समाज बांधवांला कुठलाही राजकीय पक्ष मदत करत नसतो.पक्षांतर्गत राजकारणांचा तो बळी ठरतो.अशावेळेस समाज संघटनाही खूप महत्वाची भूमिका  बजावत असते.जेव्हा सर्वांनी वाऱ्यावर सोडलेले असते.तेव्हा हीच सामाजिक संघटना व समाज बांधव आपल्या पाठीशी उभे राहतात.

वरील असे अनेक विषय या महाबैठकीत चर्चेला घेण्यात आले.या बैठकीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, धुळे, सातारा, सांगली, मराठवाडा या ठिकाणाहून महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही आढावा बैठक लोणावळा मिस्ट्रीहिल ,जैन मंदिर येथे पार पडली. यावेळी खालील लोक  डॉ.विणा कावलकर, सौ.शोभा रासकर,अनिल महाजन, हरिश्चंद्र डोके, आर.बी माळी, ऍड. संजय कानडे, प्रा.बी.बी महाजन, श्री.उनाद  महाजन,श्री.वसंत महाजन,श्री.संजय महाजन,श्री.प्रदीप महाजन,श्री मोरेश्वर भुजबळ,श्री.अनिल भुजबळ,श्री.अनिल भुजबळ, श्री. सुखदेव ,श्री.अशोक भुजबळ,श्री.जे.के.कुदळे,श्री.संदीप घोडे, चि.सचिन खलाणे,सौ.पूनम भूमकर,श्री प्रविण खेडकर,श्री.प्रकाश सोनवणे, श्री.रमेश महाजन ,श्री.सुनील महाजन, श्री.संतोष डोंगरखोस, श्री.प्रविण महाजन , श्री.अजय गायकवाड, अप्पा महाजन, साहेबराव महाजन, गोपाल महाजन, ज्ञानेश्वर महाजन, लक्ष्मण निकम, लक्ष्मण महाले बैठकीला  उपस्थित होते.

या वेळी पूनमताई भूमकर यांची पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ऍड.संजय कानडे यांची रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.सुनील उत्तम खेडकर यांची शिरुर-आंबेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.शेवटी राष्ट्रगीताने सांगता झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.