महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्यासाठी कामाला लागा – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

0

यावल :- भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे ह्या पुन्हा विजयी होतील, असा आत्मविश्वास व्यक्त करत त्यांना बहुमताने विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांचे प्रचारार्थ येथील फैजपूर रस्त्यावरील नेवे मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांच्या बैठकीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

बैठकीस आमदार हरिभाऊ जावळे, नगराध्यक्षा सुरेखा कोळी, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अध्यक्ष मीना तडवी हे प्रमुख म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी पालक मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की गेल्या पाच वर्षात मोदी शासनाने अनेक लोकोपयोगी योजना आणून विकास साधला आहे. राज्यात राज्यात मोदी शासनाविषयी अत्यंत चांगले मत असून सर्वत्र उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीस प्रसंगी आमदार हरिभाऊ जावळे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, किशोर कुलकर्णी, मीना तडवी यांचेही यथोचित मनोगत झाले आहे. बैठकीस माजी नगराध्यक्ष अतुल पाटील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे शिवसेनेचे जगदीश कवडी वाले शरद कोळी विलास चौधरी हर्षल पाटील सविता भालेराव आरपीआयचे विष्णू पारधे यांचेसह भाजपसेना व आरपीआयचे कार्यकर्ते तसेच जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत देशमुख उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.